बनावट नोटांचा व्यवसाय वाढत आहे ! २००० आणि ५०० ​​च्या खऱ्या नोटा कशा ओळखाव्यात; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात नकली नोटा बनवायचा कारभार काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. नुकतेच १० जून रोजी पुण्यात पुन्हा एकदा सुमारे १० कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या आहेत. पकडलेल्या या नोटांमध्ये २००० तसेच ५०० ​​रुपयांच्या बनावट नोटा आहेत. अशाच प्रकारे, सुरक्षिततेसाठी खऱ्या २००० रुपयांच्या नोटा चलनात ठेवण्यासाठी जुन्या मोठ्या नोटा या नव्याने बदलण्याचे सरकारने ठरविले होते. मात्र तरीही, बाजारातील हे बनावटी चलन पूर्णपणे नियंत्रित होऊ शकलेले नाहीये. अशा परिस्थितीत २००० आणि ५०० ​​रुपयांच्या खऱ्या नोटा कशा ओळखाव्यात हे जाणून घेउयात …

२०००च्या नोटा खऱ्या आहेत की नाही ते अशाप्रकारे ओळखा
२००० च्या नोटेचा बेस कलर हा मॅजेन्टा आहे आणि त्याचा आकार ६६ मिमी बाय १६६ मिमी आहे. या नोटेच्या अग्रभागी महात्मा गांधींचे छायाचित्र आणि मागच्या बाजूला मंगळयान आहे.

पुढे
ओळख क्रमांक १ नोटेला जर प्रकाशासमोर धरले तर २००० असे लिहिलेले दिसून येईल.
ओळख क्रमांक २ नोटेला जर ४५ डिग्री कोनात डोळ्यासमोर धरले तर २००० असे लिहिलेले दिसून येईल.
ओळख क्रमांक ३ देवनागरीमध्ये २००० लिहिलेले दिसेल.
ओळख क्रमांक ४ नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे चित्र आहे.
ओळख क्रमांक ५ लहान लहान अक्षरात आरबीआय आणि २००० लिहिलेले दिसेल.
ओळख क्रमांक ६ सिक्युरिटी थ्रेड आहे, ज्यावर भारत, आरबीआय आणि २००० लिहिलेले आहे. जेव्हा ही नोट थोडीशी दुमडली जाते तेव्हा या या थ्रेडचा रंग हिरवा वरून निळा होतो.
ओळख क्रमांक ७ गारंटी क्लॉज, गव्हर्नरची सही, प्रॉमिस क्लॉज तसेच आरबीआय यांचे लोगो उजवीकडे आहेत.
ओळख क्रमांक ८ हा महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्‍ट्रोटाइप (२०००) वॉटरमार्क आहे.
ओळख क्रमांक ९ डावीकडील वरच्या बाजूस आणि डावीकडून उजवीकडे तळाशी उजवीकडील नंबर्स मोठे होत जातात.
ओळख क्रमांक १० येथे लिहिलेल्या २००० क्रमांकाचा रंग बदलतो. त्याचा रंग हिरव्यावरून निळ्यामध्ये बदलतो.
ओळख क्रमांक ११ उजवीकडे अशोक स्तंभ आहे.
ओळख क्रमांक १२ त्यावर २००० लिहिलेली १२ उजवी बाजू आयताकृती बॉक्स.
ओळख क्रमांक १३ उजवीकडे आणि डावीकडे सात ब्लीड लाइंस आहेत ज्या खरखरीत आहेत.

मागे
ओळख क्रमांक १४ नोटेच्या छपाईचे वर्ष लिहिलेले आहे.
ओळख क्रमांक १५ स्लोगन सहित स्वच्छ भारताचा लोगो.
ओळख क्रमांक १६ सेंटर मध्ये भाषेचे पॅनेल
ओळख क्रमांक १७ मंगळयानाचा नमुना

अंधांसाठी
महात्मा गांधी यांचे चित्र, अशोक स्तंभाचे प्रतीक, ब्लीड लाइन आणि ओळखीचे चिन्ह खडबडीत आहे.

नवीन ५०० रुपयांच्या नोटा खऱ्या आहेत की नाहीत ते ओळखा
ओळख क्रमांक १ नोटेला प्रकाशात ठेवल्यावर ५०० लिहिलेले दिसून येईल.
ओळख क्रमांक २ नोटेला ४५ डिग्री कोनात डोळ्यासमोर धरल्यावर ५०० लिहिलेले दिसून येईल.
ओळख क्रमांक ३ देवनागरीमध्ये ५०० लिहिलेले दिसेल.
ओळख क्रमांक ४ जुन्या नोटेच्या तुलनेत महात्मा गांधींच्या चित्राचे ओरिएंटेशन आणि पोजिशन थोडी वेगळी आहे.
ओळख क्रमांक ५ नोटेला हलकेसे फिरविल्यानंतर नोटेचा रंग हा हिरव्या वरुन निळा होतो.
ओळख क्रमांक ६ जुन्या नोटच्या तुलनेत गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची सही, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआय लोगो उजवीकडे वळला आहे.
ओळख क्रमांक ७ महात्मा गांधींचे चित्र आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क आहे.
ओळख क्रमांक ८ नोटे वरच्या डाव्या बाजूला आणि खालच्या उजवीकडील संख्या डावीकडून उजवीकडे मोठी होत जाते.
ओळख क्रमांक ९ येथे लिहिलेल्या ५०० क्रमांकाचा रंग बदलतो. नोटेचा रंग हा हिरव्या वरुन निळा होतो.
ओळख क्रमांक १० अशोक स्तंभ उजव्या बाजूला, उजवीकडे सर्कल बॉक्स ज्यावर ५०० असे लिहिलेले आहे.
उजव्या आणि डाव्या बाजूला ५ ब्लीड लाइन आहेत ज्या खडबडीत आहेत.

मागे
ओळख क्रमांक -११ नोटेच्या छपाईचे वर्ष लिहिलेले आहे.
ओळख क्रमांक -१२ स्लोगन सहित स्वच्छ भारताचा लोगो.
ओळख क्रमांक -१३ सेंटर मध्ये भाषेचे पॅनेल
ओळख क्रमांक -१४ भारतीय ध्वजांसह लाल किल्ल्याचा फोटो
ओळख क्रमांक -१५ देवनागरीमध्ये ५०० असे लिहिलेले आहे.

अंधांसाठी
महात्मा गांधी यांचे चित्र, अशोक स्तंभाचे प्रतीक, ब्लीड लाइन आणि ओळखीचे चिन्ह खडबडीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment