हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबी कडून बंदी घालण्यात आल्यानंतर अभिनेता Arshad Warsi ने याबाबत सफाई दिली आहे. ट्विटरवर लोकांना विनंती करताना अर्शदने म्हंटले की,” कुठल्याही ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.” अभिनेत्याने यावेळी सांगितले की,” त्याला आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांना शेअर बाजाराबाबत कसलीही माहिती नाही.”
आपल्या ट्विट मध्ये अर्शदने म्हंटले की,” कृपया आपण ज्या काही बातम्या वाचत आहात त्यावर विश्वास ठेवू नका. मारिया आणि मला शेअर्सचे शून्य ज्ञान आहे. आम्ही सल्ला घेउनच शारदामध्ये गुंतवणूक केली आणि इतर अनेकांप्रमाणे आम्हीही आमच्या कष्टाचे पैसे गमावले.”
You Tube व्हिडिओद्वारे शेअर्सच्या किंमतींत फेरफार केल्याचा आरोप
याबाबत अधिक माहिती अशी कि, बॉलिवूड अभिनेता Arshad Warsi, त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि इतरांवर युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करून दोन कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतींत हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरुवारी सेबीने अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया आणि साधना चॅनलच्या काही प्रमोटर्ससहीत 45 जणांना रोखे बाजारात ट्रेडिंग करण्यास बंदी घातली.
आपल्या तपासणीत SEBI ला आढळले की, ही लोकं YouTube चॅनेलवर दिशाभूल करणारे व्हिडिओ पोस्ट करून गुंतवणूकदारांना साधना ब्रॉडकास्ट आणि शार्पलाइन ब्रॉडकास्टचे शेअर्स खरेदी करण्याबाबत सांगत होते. या दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओनंतर संबंधित दोन्ही कंपन्यांच्या शेअरधारकांची संख्या अचानक वाढली. यावेळी बंदी घालण्याबरोबरच बेकायदेशीरपणे कमावलेले 54 कोटी जप्त करण्याचे आदेशही SEBI कडून देण्यात आले आहेत. यासोबतच पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतीही मालमत्ता विकू नये, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. Arshad Warsi
या प्रकरणातील इतर दोषींची नावे खालीलप्रमाणे आहेत
या प्रकरणात सेबी कडून जतीन शाह, हेली शाह, दैविक शाह, अंगद राठोड, पुरव पटेल, सुभाष अग्रवाल, गौरव गुप्ता, पूजा अग्रवाल, वरुण मीडिया, राकेश गुप्ता, मनीष मिश्रा, अंशु मिश्रा, दीपक द्विवेदी आणि इतरही काही जणांना दोषी घोषित करण्यात आले आहेत. अर्शद प्रमाणेच आता या लोंकांनाही बाजारात ट्रेडिंग करण्यास बंदी घातली गेली आहे.
एप्रिल-सप्टेंबर 2022 दरम्यान तपासात आलेली प्रकरणे
एप्रिल-सप्टेंबर 2022 दरम्यान सेबीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. एप्रिल 2022 ते जुलै 2022 या कालावधीमध्ये शेअर्सच्या किंमती आणि व्हॉल्यूममध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. यानंतर जुलैच्या मध्यात, साधनाच्या शेअर्सबाबतचे दिशाभूल करणारे व्हिडिओ ‘द एडव्हायझर अँड मनीवाइज’च्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले होते. मे 2022 मध्ये मिडकॅप कॉल्स आणि प्रॉफिट यात्रा चॅनलवर शार्पलाइनच्या संदर्भात असेच काहीसे व्हिडिओ अपलोड केले गेले होते. Arshad Warsi
वाढणाऱ्या किंमतींत शेअर्स विकून कमावला नफा
आपल्या दोन वेगळ्या अंतरिम आदेशांमध्ये सेबीकडून सांगण्यात आले की, अशा व्हिडिओद्वारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या गेल्या.तसेच याद्वारे गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवण्यासाठी साधना ब्रॉडकास्ट आणि शार्पलाइन ब्रॉडकास्टचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला गेला. या शेअर्सच्या व्हॉल्यूममध्ये मोठ्या संख्येने किरकोळ गुंतवणूकदार आहेत, जे कदाचित दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओमुळे प्रभावित झाले आहेत. या कालावधीत, साधनाच्या काही प्रमोटर्सनी आणि प्रमुख व्यवस्थापनाने त्यांच्या भागभांडवलाचा महत्त्वपूर्ण भाग वाढलेल्या किंमतींत विकून मोठा नफा कमावला. या प्रकरणात Arshad Warsi ला 29.43 लाख रुपये तर त्याच्या पत्नीला 37.56 लाख रुपयांचा नफा झाला. तसेच इर्शाद हुसैन वारसीने 9.34 लाखांची कमाई केली. हे तिघेही कृत्रिमरित्या शेअर्समधील व्हॉल्यूम वाढवत होते.
एका व्हिडिओमध्ये…अदानी ग्रुपने साधना खरेदी केल्याचा खोटा दावा
अदानी ग्रुपने साधना ब्रॉडकास्ट विकत घेत असल्याचा दावा या चॅनल्सवरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंमध्ये करण्यात आला होता. तसेच या करारानंतर कंपनीचे मार्जिनही वाढेल, असेही सांगण्यात आले होते. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ही कंपनी चित्रपट निर्मितीकडे वाटचाल करत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. यावेळी कंपनी सोबत एका मोठ्या अमेरिकन गुंतवणूकदाराने चार धार्मिक चित्रपटांच्या निर्मितीसाठी 1,100 कोटी रुपयांचा करार केला असल्याचेही यामध्ये सांगण्यात आले आहे. Arshad Warsi
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sebi.gov.in/
हे पण वाचा :
लवकरच मुंबई-गोवा मार्गावरही धावणार Vande Bharat Train, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???
Amazon चा जबरदस्त डिस्काउंट !!! 20 हजारांपेक्षा कमी किंमतींत मिळवा 95 हजारांचा ‘हा’ स्मार्टफोन
Gold Hallmarking : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !!! 1 एप्रिलपासून लागू होणार मोठा बदल
PM Kisan Yojana चे पैसे मिळाले नसल्यास ‘या’ नंबरवर करा कॉल !!!