देशात मोदींचे नव्हे तर अदानी- अंबानीचे सरकार; लाल किल्ल्यावरून राहुल गांधी बरसले

rahul gandhi modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार नसून अंबानी आणि अदानी यांचे सरकार आहे अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनी हल्लाबोल केला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज राजधानी दिल्लीत आली असून यावेळी थेट लाल किल्ल्यावरून राहुल गांधींनी जोरदार भाषण करत मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे.

आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले, संपूर्ण देशाला माहित आहे की हे नरेंद्र मोदींचे सरकार नाही, अंबानी अदानींचे सरकार आहे. मी 2,800 किमी चाललो, मला कुठेही द्वेष किंवा हिंसाचार दिसला नाही, पण जेव्हा जेव्हा मी न्यूज चॅनेल उघडतो तेव्हा मला नेहमीच द्वेष आणि हिंसा दिसते. असे घडते कारण त्यांना तुमचे लक्ष इकडून तिकडे वळवायचे असते.

भाजपचे लोक हिंदू धर्माबद्दल बोलतात. मला विचारायचे आहे की, हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे – गरीब आणि दुर्बल लोकांना मारले पाहिजे. हिंदू धर्म म्हणतो, घाबरू नका. मात्र भाजपवाले संपूर्ण देशात 24 तास भीती पसरवण्याविषयी बोलतात. चीन आणि भारतामधील सीमावादावरून सुद्धा राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. जगात खरी स्पर्धा चीन आणि भारतामध्ये आहे. चीनने भारताची 2000 चौरस किलोमीटर जमीन घेतली आहे. चीनने आमच्या सीमेत प्रवेश केला नाही, असे मोदी म्हणतात. पण कोणीच आले नाही तर मग आमचे सैन्य त्यांच्याशी 21 वेळा का बोलत आहे? असा सवालही राहुल गांधी यांनी केला.