हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत शिवसेनेतून चाळीस आमदारांना बाहेर घेऊन पडले. आणि ठाकरे व शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंजच दिले आहे. “मी राजीनामा देतो. तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी ताकद लावायची ती लावा. जेवढे खोके लावायचे ते लावा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही,” आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज वरळी येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी चॅलेंजदेतो की, मी वरळीतून राजीनामा देतो. हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा. निवडून कसं येता ते बघतोच,
40 आमदारांनी गद्दारी केली. माझे गद्दार खासदारांना आव्हान आहे. तुम्हीही खासदारकीचा राजीनामा द्या. निवडून येताच कसे ते पाहतो. आपला दवाखाना शिवसेनेने सुरू केलेला आहे. या गद्दारांनी नाही. मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं या हेतूने काम करणाऱ्यांना आता आपल्याला रोखायचं आहे, असेही ठाकरे यांनी म्हंटले.