हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांना राजीनामा न देण्याचे आदेश देत आपली राजकीय भूमिकाही स्पष्ट केली. यावेळी त्यांनी पाच पांडवांचे युद्ध जिंकण्याचे मागचे कारणही सांगितले. तर भाजपला टोलाही लगावले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करीत मुंडेंना सल्ला दिला आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणही साधला आहे.
भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना महाभारतातील पाच पांडवांची गोष्ट सांगत त्यांच्या संयमाविषयी माहिती दिली होती. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवरी निशाणा साधला. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करीत पंकजा मुंडे यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत.
"नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका.@Pankajamunde— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 13, 2021
मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, “पंकजा ताई तुम्ही आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. “नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका.,” असे मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला देत एक प्रकारे भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी पंकजा यांचा ताई असा उल्लेख करीत माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा शकुनी मामा असा उल्लेख केला आहे. तर त्यांनी भाजपमध्येही धर्मराज व दुःशासन सारखे लोक असल्याचे अप्रत्यक्षपणे नाव न घेता म्हटले आहे.akaja