उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (kailas patil) यांनी राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी मागच्या सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन पुकारले होते. यानंतर आज कैलास पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. कैलाश पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस होता.
आमदार कैलास पाटील (kailas patil) गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण आंदोलन करत असून शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाटील यांना फोन करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत पैसे येत नाहीत तो पर्यंत मी माघार घेणार नसल्याची भूमिका पाटील यांनी घेतली होती. आज सकाळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कैलास पाटील यांची भेट घेतली होती. कैलाश पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधल्यानंतर उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार, नारळ पाणी पिऊन पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं.
आंदोलन स्थळावरचे वातावरण झाले भावनिक
या उपोषण स्थळी कैलास पाटील यांची मुलगी आराध्या व पुतणी राजेश्वरी ह्या आल्या त्यानंतर एक भावनिक वातावरण झाले होते. मुलगी व बापाचे नाते किती घट्ट असते हे यावेळी लोकांना पाहायला मिळाले. आंदोलनातून चला असे म्हणत या दोघींनी अनेक वेळा आमदार पाटील (kailas patil) यांचे हात ओढले त्यानंतर गळयात पडून गालावर पपीसुद्धा घेतली. बाप आणि लेकीचे हे नाते पाहून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आले होते.
हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी