मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांत देशात इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक (electric car fire) वाहनांच्या सुरक्षततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच आता एका इलेक्ट्रिक कारलाही (electric car fire) आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये टाटा नेक्सन ईव्हीला आग लागली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. Tata Nexon EV ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार (electric car fire) आहे. याच कारने मुंबईच्या रस्त्यावर पेट घेतला आहे.
मुंबईच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक Tata Nexon EV कारने घेतला पेट pic.twitter.com/pGiKPVzN2A
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 23, 2022
हि घटना वसई पश्चिम परिसरामध्ये घडली आहे. रस्त्यावर कार आगीच्या विळख्यात सापडल्याचं व्हिडीओत दिसतं आहे. मात्र हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार हि आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान याबाबत टाटा मोटर्सने कारमध्ये आग का लागली, याचा तपास करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटरसह (electric car fire) 30.2kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतं. याच्या मोटर 129 बीएचपी पॉवर आणि 245 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचंही ऑप्शन मिळतं. डीसी फास्ट चार्जर वापरून ही कार फक्त 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज करता येते. रेग्युलर चार्जरने 8 तासात 20 ते 100 टक्के चार्ज होते. एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही कार 312 किमी प्रति रेंज देते.
हे पण वाचा :
गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ; राऊतांचे ट्विटद्वारे बंडखोर आमदारांना आवाहन
Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले
अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते- नाना पटोले
काही झाले तरी आम्हीही उद्धव ठाकरेंसोबत”; नाना पटोलेंनीही स्पष्टच सांगितले
आता ‘या’ विदेशी बँकेने देखील आपल्या FD वरील व्याज दरात केली वाढ !!!