गुगल, फेसबुक नंतर आता चीनमध्ये LinkedIn ही होणार बंद, मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मायक्रोसॉफ्टने गुरुवारी जाहीर केले की,” ते चीनमधील आपल्या सोशल नेटवर्किंग अ‍ॅप लिंक्डइनचे लोकल व्हर्जन बंद करणार आहे.” लिंक्डइन हे अमेरिकेतून कार्यरत असलेले शेवटचे मोठे सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे, जे अजूनही चीनमध्ये चालू आहे.

लिंक्डइन 2014 मध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आले. मात्र हे अत्यंत लिमिटेड फीचर्ससह लॉन्च केले गेले होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, नवीन व्हर्जन विशेषतः चीनसाठी लाँच केले गेले. जेणेकरून ते चीनमधील परदेशी कंपन्यांसाठी बनवलेल्या इंटरनेटच्या कडक नियमांचे पालन करू शकतील.

कंपनी काय म्हणाली हे जाणून घ्या
मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की “चीनमधील आव्हानात्मक ऑपरेटिंग परिस्थिती आणि कडक पालन आवश्यकतांमुळे ते लिंक्डइन बंद करत आहे.” मात्र, मायक्रोसॉफ्टने असेही म्हटले आहे की,” ते त्याऐवजी चीनमध्ये जॉब सर्च वेबसाइट सुरू करतील, ज्यामध्ये लिंक्डइनचे सोशल नेटवर्क फीचर्स नसेल.”

फेसबुकपासून स्नॅपचॅटपर्यंत चीनमध्ये जवळपास सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आहे. अगदी चीनने इथे गुगल सर्चवर बंदी घातली आहे. त्याजागी चीनने स्वतःचे सोशल मीडिया वर्ल्ड डेव्हलप केले आहे.

हे प्लॅटफॉर्म वापरले जात आहेत
चीनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपऐवजी wechat, फेसबुक-ट्विटरऐवजी Sina Weibo, गुगलऐवजी Baidu Tieba, मेसेंजरऐवजी Tencent QQ आणि यूट्यूबऐवजी Youku Toudo आणि Tencent Video सारखे प्लॅटफॉर्म वापरले जातात.

Leave a Comment