हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठया घडामोडी घडताना पाहिला मिळत आहेत. आज सकाळीच नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. यानंतर दुपारी लगेच प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. त्यानंतर लगेच अजित पवार आजारी असताना देखील अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना होत असल्याची बातमी आली. त्यामुळे सध्या फुट पडली असताना देखील राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
आज दिवसभरात राष्ट्रवादी पक्षात घडलेल्या घडामोडी पाहिला गेलो तर त्याची प्रथम सुरुवात शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीपासून होते. कारण आज सकाळी बंड करून भाजपमध्ये अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी बऱ्याच काळानंतर शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर दुपारी लगेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी रवाना झाले. याठिकाणी अगोदरच अजित पवार आले होते. यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आले नसले तरी मात्र आता आजारी असतानाही अजित पवार दिल्लीला गेले आणि त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीत लागोपाठ घडलेल्या या सर्व घडामोडीमुळे राष्ट्रीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच आजच्या भेटींविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे आज त्यांना भेटण्यासाठी प्रतापराव पवार बाणेरमधील घरी गेले होते. याचं ठिकाणी अजित पवार असल्यामुळे या सर्वांची एकत्र भेट झाली. मात्र या भेटीनंतर अजित पवार अमित शहांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.