जळगावमध्ये पुन्हा एकदा हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघड, 6 महिलांसह 2 पुरुष ताब्यात

Sex Racket
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या हाय प्रोफाईल कुंटनखान्यावर (Sex Racket) जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून बुधवारी छापा टाकला. गोलाणी मार्केटजवळ एका कार्यालयाच्या खोलीत सुरू असलेल्या कुंटनखान्यातून (Sex Racket) पोलिसांनी 2 ग्राहक पुरुष आणि 6 महिलांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
शहरातील गोलाणी मार्केट परिसरात असलेल्या एका खोलीत कुंटनखाना (Sex Racket) सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी छापा टाकला. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.

ती खोली एका कंपनीच्या नावाने नोंदणीकृत आहे. पोलीस पथकातील कर्मचारी बनवाट ग्राहक म्हणून या खोलीत गेले आणि कुंटनखाना (Sex Racket) चालू असल्याचं निर्दशनात येताच पोलिसांनी धावा बोलत या ठिकाणी छापा टाकला अशी माहिती पोलिसांनी दिली. शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटनखाना (Sex Racket) सुरू असताना अद्याप पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…