कोरोना पार्श्वभुमीवर पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. तुलनेने महाराष्ट्रातील रुग्ण अधिक वाढत आहेत. त्यातही पुणे, मुंबई या दोन शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. पुणे शहरात रोज मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. मात्र वाढत्या चाचण्यांमुळे स्वॅब तपासणीचे अहवाल उशीरा येत आहेत. म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाला पुण्यात आणखी एक स्वॅब चाचणी केंद्र वाढवावे अशा विनंतीचे पत्र लिहिले आहे. त्यांनी या केंद्राची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

सद्यस्थितीला पुण्यात एनआयव्ही मध्ये स्वॅब तपासले जात आहेत. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात स्वॅब संकलन केले जात आहे. मात्र यंत्रणेवर त्याचा ताण येतो आहे. आलेल्या स्वॅबपैकी सर्व स्वॅबचे अहवाल वेळेवर येत नसल्याने आता स्वॅब संकलनही कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह लोक नकळत सगळीकडे वावरत राहिले तर मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढण्याचा वेगळाच धोका आहे. म्हणूनच यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी पुण्यात आणखी एक स्वॅब चाचणी केंद्र उभारण्याची आवश्यक्ता असल्याचे मोहोळ यांनी या पत्रात लिहिले आहे.

संचारबंदी हा संक्रमण टाळण्याचा कायमचा उपाय नसला तरी स्वॅब संकलन आणि त्याचे अहवाल वेळेवर आले नाहीत तर सकारात्मक रुग्णांची नेमकी संख्या कळणार नाही. यातून संक्रमणाला अटकाव घालणे अवधड होईल. चाचणी क्षमता वाढविल्याने प्रशासनाला त्याची मदतच होईल. नाहीतर शहरातील विषाणू संक्रमणावर नियंत्रण करण्याची प्रक्रिया किती लांबेल सांगता येणार नाही. म्हणूनच चाचणी केंद्र वाढवून स्वॅब संकलन वाढविल्यास विलगीकरणाची प्रक्रिया ही सुलभ होईल असे मोहोळ यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.