धक्कादायक ! उस्मानाबादमध्ये कॉपी करताना पकडल्याने विद्यार्थाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने एका कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला आहे. स्वप्नील फुलचंद ढोबळे असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो समुद्रवाणी येथील रहिवासी आहे. स्वप्नीलने स्वतःच्या शेतात कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. स्वप्नील कृषी पदविका अभ्यासक्रमाचा विषयचा पेपर देण्यासाठी गेला होता. त्यावेळी परिक्षा केंद्रात त्याला कॉपी करताना परीक्षा विभागाच्या पथकाने पकडले. त्यामुळे त्याला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. याच तणावातून त्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

एक वर्षासाठी केले होते निलंबित
मृत स्वप्नील ढोबळे हा कृषी पदविका अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. तो येडशी येथील ऍग्री कल्चर महाविद्यालयात डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकत होता. सध्या स्वप्नीलची परीक्षा सुरु आहे. स्वप्नील नेहमीप्रमाणे 26 मे रोजी येडशी येथील आपल्या महाविद्यालयात पेपर देण्यास गेला होता. स्वप्नीलचा परीक्षेचा अभ्यास नीट न झाल्याने त्याने पेपरमध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र यावेळी कॉपी करत असताना परीक्षा विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. यानंतर परीक्षा विभागाकडून स्वप्नीलला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. यामुळे मृत स्वप्नील प्रचंड तणावात होता. याच नैराश्येतून त्याने आपल्या शेतातील कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली. स्वप्नीलने उचललेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबावर आणि गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वप्निलच्या माघारी आई आणि एक भाऊ असा परिवार आहे.

हे पण वाचा :

साताऱ्याचे सुपुत्र सुभेदार विजय शिंदे लडाखमध्ये शहिद

4 शतकांसह Jos Buttler ने रचला इतिहास, दिग्गजांनाही टाकले मागे

एकवीरेला चाललेल्या कारने बोरघाटात घेतला पेट, व्हिडिओ आला समोर

नॉनव्हेज खाल्ल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही; पवारांनी बाहेरुनच घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

मुंबई ड्रग्ज प्रकरणात NCB कडून आर्यन खानला क्लीन चिट !!!

Leave a Comment