जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कृषी दुकानांवर कारवाई न झाल्यास कृषी अधिकाऱ्यांना बळीराजा संघटनेचा इशारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बोगस बियाणे आणि चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कृषी दुकानांवर भरारी पथकांद्वारे कारवाई करावी. या प्रकाराकडे सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यास त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना … Read more

गेल्या वर्षीची चूक टाळण्यासाठी सोयाबीन बियाणांची कृषी विभागाकडून तपासणी

soyabean

औरंगाबाद | सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात येऊ नये म्हणजेच गेल्या वर्षीची पुनरावृत्ती टाळण्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कंबर कसली आहे. खाजगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांची नमुने घेण्यासाठी कृषी विभागाची पथके तैनात केली आहेत. औरंगाबाद परभणी व नागपूर येथील प्रयोगशाळेत बियाण्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी सुरू असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली … Read more

वीज पडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू; मका पेरताना घडली घटना

औरंगाबाद : जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजेदरम्यान वारा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी वीज कोसळून बाभुळगाव तरटे येथील 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 21 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. याच दरम्यान, लोहगड नांद्रा येथे वीज कोसळून सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या. समृद्धी विष्णू तरटे (वय 18) असे ठार झालेल्या तरुणीचे … Read more

रयत क्रांतीचे दूध दरासाठी सरकार विरोधात गुरुवारी चाबूक फोड आंदोलन : सदाभाऊ खोत

Sadhbhau Khot

सांगली | पशुधनाचा उत्पादन खर्च वाढत असताना दुधाला भाव मिळत नाही, त्यामुळे आर्थिक कोंडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारकडून दूध दरवाढीसाठी धोरण राबविले जात नाही, तर महानंदा भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. दुग्ध व पशुसंवर्धन खाते बंद करुन दुधाला एस.एम.पी. जाहीर करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रयत क्रांती संघटनेच्यावतीने राज्य सरकारविरोधात संपूर्ण राज्यभर चाबूक फोड आंदोलन केले … Read more

सांगलीतील द्राक्ष व्यापाऱ्याला दुबईतील कंपनीकडून 2 कोटी 80 लाखांचा गंडा

Fraud

सांगली | सांगली जिल्ह्यातील मिरज येथील दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ ट्रेडिंग एल. एल या कंपनीने येथील एका द्राक्ष व्यापाऱ्याला 2 कोटी 80 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पांडुरंग जगताप यांनी कंपनीविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जगताप यांची द्राक्ष निर्यात करणारी ऑल एशिया इम्पोर्ट अँड … Read more

कराड शहरात मुसळधार पाऊस; कृष्णा हाॅस्पिटलमध्येही पाणी शिरल्याने काही काळ कर्मचार्‍यांची तारांबळ

कराड : मान्सूनपूर्व पावसाने पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी संध्याकाळी कराड शहरात झालेल्या मुसळधार पाऊसाने नागरिकांची पळापळ केली. कराड व मलकापूर शहरातील गटारे नगरपालिकांनी स्वच्छ न केल्याने तुडुंब भरून वाहत होती. मान्सून येण्याअगोदरच मान्सूनपूर्व पावसाने नगरपालिकांची लक्तरे वेशीवर टांगली. तर शहरातील कृष्णा हाॅस्पिटलमध्येही पाऊसाचे पाणी शिरल्याने काही काळासाठी कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. कराड शहरात … Read more

काळा दिवस : दिल्ली सीमेवर कृषी कायद्याच्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण, शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि घरांवर काळे झेंडे लावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत, त्याला आज (दि. 26) सहा महिने पूर्ण होत आहेत. शेतकरी संघटनेकडून आज म्हणजेच २६ मार्च रोजी ‘काळा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ही माहिती दिली आहे. या काळा दिवसाच्या … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : पहिल्याच दिवशी 6 जणांचे अर्ज दाखल तर 127 अर्जाची विक्री

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि सातारा, सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या शिवनगर (रेठरे) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 6 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर सुमारे 127 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. उद्या बुधवारी 26 मे रोजी शासकीय सुट्टी असल्याने इच्छुकांना … Read more

डेड बॉडी आणायला चाललेल्या अँब्युलन्सला पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात; कारखान्याच्या ट्रेक्टरमधून पडलेल्या मळीमुळे चालकाचा ताबा सुटला

कराड | डेड बॉडी आणायला निघालेल्या अँब्युलन्सला पुणे बंगळूर महामार्गावर अपघात झाला आहे. कराड शहरातील नटराज टॉकीजच्या समोर मंगळवारी संध्याकाळी ५:३० च्या दरम्यान हा अपघात झाला असून यामध्ये ऍम्ब्युलन्स ड्राइव्हर किरकोळ जखमी झाला आहे. महामार्गावर कारखान्याच्या ट्रेक्टॉरमधून पडलेल्या मळीमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या … Read more

जनावरांच्या चारा छावणीत भ्रष्टाचार प्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

Chara Chavani

सातारा | बिजवडी विकास सेवा सोसायटी संचलित जनावरांच्या चारा छावणीमधील भ्रष्टाचार प्रकरणातील दहिवडी पोलिसांच्या अटकेत असलेल्या दोघांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दहिवडी यांनी दिला आहे. या प्रकरणात पोलिस कोठडी सुनावण्यात आलेले चेअरमन यशवंत नामदेव शिनगारे व सचिव विकास दिनकर भोसले अशी दोघांची नांवे आहेत. माण तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झालेची शिवसेना … Read more