ठाकरे सरकार कधी व कसं पडणार हे अजितदादांना चांगलं ठाऊक आहे: चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित असून तो कधी होणार हे अजित पवार यांना चांगलं ठाऊक आहे. ठाकरे सरकार कधी आणि कस पडणार हेही अजितदादांना ठाऊक आहे, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. विझण्यापूर्वी दिवा जसा मोठा होता, त्याप्रमाणे सध्या महाविकासआघाडीची फडफड सुरु आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आम्ही किंवा त्यांनी कोणीही अहंकार बाळगण्याची गरज नाही. कालचक्र हे फिरत असतं. 15 वर्षे त्यांची सत्ता होती, ती जाऊन पाच वर्षे आमची सत्ता आली होती. आता पुन्हा त्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे कुणीही अमरपट्टा घालून आलेले नाही. महाविकासआघाडीचं सरकार कधी आणि कसं पडणार, हे अजित पवारांना नेमकेपणाने ठाऊक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पंढपरपूरची पोटनिवडणूक महाविकासआघाडीच्या हातातून गेली आहे. त्यामुळे अजित पवार यांना राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नसलेल्या लोकांच्या घरी जावे लागते. हा अजित पवारांचा स्वभाव नाही. हा स्वभाव शरद पवार यांचा आहे. हे निवडणूक त्यांच्या हातातून गेल्याचं लक्षण आहे. अजित पवार यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दिसत आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

“जयंत पाटील यांचे स्वप्नरंजन आहे. अठरा महिने झाले, ते सांगत आहेत की आमच्याकडून गेलेले परत येणार आहेत, परत येणार आहेत. दिवसा स्वप्नं पाहायला कुणाला अडचण नसते. मात्र भाजप पूर्वीपेक्षाही जबरदस्त होत चाललेली आहे. सामान्य लोकांना माहिती आहे, की कुठल्याही क्षणी सरकार जाऊ शकतं, अशा दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. दिवा विझण्यापूर्वी जास्त मोठा होतो” असं चंद्रकांत पाटील पंढरपुरात बोलत होते.

You might also like