मुंबई | विधीमंडळाच्या पायर्यांवर सत्ताधारी आक्रमक झालेले असताना आज विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधे बाचाबाची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पावार आणि भाजपा नेते गिरिष बापट आमने सामने आल्याने सभागृहा बाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री भाषण करण्यासाठी उठले असता विरोधकांनी सभात्याग केल्याने सत्ताधार्यांची पंचाईत झाल्याचे बोलले जात आहे.
विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री गिरिष बापट वैतागून मिडिया स्टँडकडे आले आणि त्याचवेळी अजित पवार त्यांच्यासमोर आले. त्यावेळी ‘दुष्काळावर चर्चा चालू आहे. तुम्ही चर्चेत सहभागी व्हावं’ अशी विनंती बापट यांनी केली. यावेळी ‘तुम्ही सभागृहाचं कामकाज का रेटून नेत आहात? तुम्ही चक्क नऊ बिलं आज का काढलीत.’ असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सभात्याग का केला याचं स्पष्टीकरण बापट यांना दिले. मराठा आरक्षणावर
आम्ही पण सरकार मधे होतो असं अजित पवार यांनी म्हटल्यानंतर तुम्ही सरकार मधे होता तेव्हा आम्ही तुमचं एकत होतो. तुम्ही पाच जण बोलला आणि मुख्यमंत्री बोलायला उठल्यानंतर मात्र सगळे बाहेर हलला असे म्हणत ‘ही कसली पद्धत बोलण्याची ?’ असा सवाल बापट यांनी विचारला. ‘आम्ही विनंती करायला आलोय, सभागृहात दुष्काळावर चर्चा सुरु आहे. तुम्ही सभागृहात यावं आणि चर्चेत सहभागी व्हावं’ अशी विनंती गिरिष बापट आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी पवार आणि विखे पाटील यांना केली.
इतर महत्वाचे –
जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले
आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारला भिमा कोरेगाव सारखी भांडणे लावायची आहेत – धनंजय मुंडे