मुंबई प्रतिनिधी | अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आज सकाळ पासून सुरु होती. पवार सकाळ पासून अनरिचेबल झाल्याने आता अजित पवार काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आपण आज शपथविधी घेणार नसल्याचे पवार यांनी स्वत: जाहिर केले आहे.
यावेळी आपण उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होता. मात्र तुम्ही बंडखोरी केल्यामुळेच तुम्हाला डावलण्यात आलं आहे काय असा प्रश्न एका पत्रकारानाे केला असता मी बंड केला असं तुम्ही कसं काय म्हणता असं म्हणत अजित पवार चांगलेच भडकले. तुम्ही स्वत:च असे काहीतरी जाहिर करता की आमुक रुसला, तमुक फुगला. मात्र तसे काहीही नसते. मी बंड केला नाही. माझी ती भुमिका होती. मात्र सध्या मी त्यावर काहिही बोलणार नाही असं पवार म्हणाले.
दरम्यान महाविकास आघाडीच्या सरकार मधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रत्तेकी दोन मंत्र्यांचा आज शपथविधी होणार आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि आणखी एकजन तर राष्ट्रवादी कडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ शपथ घेणार आहेत.