हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची व पुण्याच्या पालक मंत्रीपदाची धुरा चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांभाळली. दरम्यान आता विरोधी पक्षनेतेपदाची सूत्री स्वीकारत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविषयी वर्तवलेल्या अंदाजामुळे आता कोल्हापूरच्या पाटलांचे टेन्शन मात्र, चांगलेच वाढले आहे. आता पुण्याचे पाल्कमंत्रीपद कोणाला मिळणार अशा चर्चा केल्या जाऊ लागल्या आहेत. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचं पारडं जड असल्यामुळे मिसाळ यांच्याकडे पालकमंत्रिपदही येण्याची शक्यता आहे.
भर विधानसभेच्या सभागृहात अजित पवारांनी “चंद्रकांत दादा बाकडे वाजवू नका, तुमच्याच मंत्रिपदाबाबत नक्की नाही,’ असे म्हंटले होते. त्यांनी एकप्रकारे चंद्रकांतदादांना सूचक इशाराच दिला. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्येही कुणाला मंत्रिपद मिळणार? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान युती सरकारच्या काळात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल मंत्री होते. त्याच सरकारमध्ये खासदार गिरीश बापट यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाबरोबरच पालकमंत्रीपदही होते. मात्र, गिरीश बापट लोकसभेत गेल्यानंतर काही महिन्यांसाठी चंद्रकांत पाटील यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पाल्कमंत्रीपदाची जबाबदारी आली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांवर अनेक कर्णनै निशाणा साधला. आता पुण्याच्याच पालकमंत्री पदाच्या मुद्यांवरून अजितदादांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वक्तव्य करत त्यांचे टेन्शन वाढवले आहे.