अजित पवारांनी घेतली चक्क शिवसेनेच्या शाखेत बैठक; फोटो होतोय व्हायरल

सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता असल्याने विरोधक अन् सत्ताधारी यांच्यात जोरदार शाब्दिक धुमश्चक्री पहायला मिळाली. दिवसभरात भाजप आणि राष्ट्रवादी कडून जोरदार प्रचार सभा घेण्यात आल्या. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिवसेनेच्या शाखेतील एक फोटो सोशल मिडियात चांगलाच व्हायरल होतो आहे.

अजित पवार आज पंढरपूर दौर्‍यावर होतेन. आज संध्याकाळची शेवटची प्रचारसभा झाल्यानंतर पवार यांनी शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. हा फोटो मंगळवेढा येथील शिवसेना भवनातील असल्याचे समजत आहे. या फोटो अजित पवार यांच्या पाठिमागे बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो दिसतो आहे. तसेच पवार यांच्यासमोर जिल्ह्यातील काही प्रमुख कार्यकर्ते दिसत आहेत.

दरम्यान, राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. या सरकारला दीड वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्रित मिळून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारची लोकप्रियता ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा –

You might also like