हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अनेक योजनांबाबत तरतुदी केल्या जात असून निधीच्या घोषणाही केल्या जात आहेत. आज पार पडलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीत वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. “महाराष्ट्र सरकारने आमदार निधी सध्याच्या 4 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आमदारांच्या गाडीचे ड्रायव्हर, पीए यांच्या पगारातही वाढ करण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले.
गेल्या आठवडाभरापासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. आज पार पडलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत माहिती दिली. यावेळी पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पातून सर्वच घटकांना न्याय देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारांना स्थानिक पातळीवर विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जातो.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/671584270653528
राज्यातील आमदाराणीला विकास कामांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारतर्फे यापूर्वी आमदारांना चार कोटी रुपये निधी दिला जात होता तो आता पाच कोटी करण्यात आला आहे. त्याचबरोबर आमदार यांचे ड्रायव्हर याचा पगार वाढण्यात आला असून पीएच्याही पगारात वाढ करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अधिवेशनात दिली.