तीन पक्षांचे सरकार त्यामुळे भांड्याला भांडं लागतंच, राष्ट्रवादीची मते शिवसेनेला देणार ; अजित पवारांचे महत्वाचे विधान

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीवरून आता राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. अशात राज्यसभेच्या जागांचे मताचे गणित आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. यावेळी आघाडीतील काही नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्यांनी महत्वाचे विधानही केले. “तीन पक्षांचे सरकार आहे त्यामुळे भांड्याला भांडे हे लागतचं, त्यामुळे काळजी घ्यावी लागते. आणि राज्यसभेत राष्ट्रवादीचे मत हे शिवसेनेला देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यसभेसाठी एकूण उमेदवारांपैकी पाच उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येणारच आहेत. त्यामध्ये भाजपचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा एक-एक उमेदवार निवडूण येतील. एकेकाळी शिवसेनेने आम्हाला पाठींबा दिला. आज आम्ही त्यांना मदत करत आहोत. आम्ही आमचे मत शिवसेनेलाच देणार आहोत. त्यामुळे घोडेबाजार करण्याचा प्रश्नच नाही. शेवटी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.

राज्यात काहीही असत तरी स्थानिक परिस्थिती पहावी लागते. नाना पटोले पाच ते वैयक्तिक मत असू शकत. आम्ही आमच्या पक्षातील अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाचा अधिकार द्यावा, म्हणून वकिलांच्या मार्फत न्यायालयात जाणार आहोत, असेही पवार यांनी म्हंटले.

15 हजार 502 कोटी येणे अजून बाकी

यावेळी अजित पार यांनी केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आकडेवारीच सादर केली. ते म्हणाले की, जीएसटीची आकडेवारी सादर करताना अजित पवार म्हणाले, की मार्च 2022पर्यंत महाराष्ट्र सरकारकडे येणारी जीएसटीची रक्कम ही 29 हजार 647 कोटी रुपये होती. त्यापैकी केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या राज्यांची 21 राज्यांची 86 हजार 912 कोटी रक्कम रिलीज केली. राज्याचे 14 हजार 145 कोटी आपल्याला मिळाले. अजून येणे असणारी रक्कम 15 हजार 502 कोटी रुपये आहे. जेव्हा जीएसटी आला त्यावेळी असे सांगण्यात आले होते, की मार्च 2022पर्यंत कमी पडणारी रक्कम राज्यांना दिली जाईल. त्यानुसार 15 हजार 502 कोटी आपल्याला येणे बाकी आहे, असे पवार म्हणाले.

कोरोनाबाबत काय म्हणाले अजित पवार?

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबाबत अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. “राज्यातल्या कोरोनाच्या केसेस सातत्याने वाढतायत. त्यामुळे सध्या काळजीचं वातावरण आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पण एकदा का कोरोना रुग्णांची संख्या वाढली की ती कशी पटकन हाताबाहेर जाते, हे आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लाटेदरम्यान बघितलं आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे, असे अजित पवार यांनी म्हंटले.