हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. दरम्यान आज मुंबईतील विधानभवनात ठाकरे सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडली आहे. “कोरोनामुळे मंदावलेला राज्याचा आर्थिक विकास हा भरून काढण्यासाठी आणि विकास गतिमान करण्यासाठी विकासाची पंचसूत्री हा विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. या कार्यक्रमासाठी 4 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर राज्यातली गुंतवणूक वाढेल आणि एक ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल,” असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
या अर्थसंकल्पात प्रामुख्याने अनेक गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गोष्टी आणि त्यासाठी देण्यात आलेली रक्कम याविषयी सभागृहाला माहिती दिली. म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यात त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून 250 कोटी रुपयांचा निधी उपलबद्ध करून देण्यात आला आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1576418862719711
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि वित्तमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विधानभवत सभागृहात अर्थसंकल्प मांडला.
अर्थसंकल्पात या आहेत तरतुदी –
1) पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाल 406 कोटी
2) मुंबईतील पशुविद्यालयाला 10 कोटींची तरतूद
3) महसूल विभागात शेळी प्रकल्प उभारणार
4) आरोग्य विभागाला 11 कोटींची तरतूद
5) सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार
6) गोसेखुर्द प्रकल्पाला 850 कोटींचा निधी
7) हवेलीत संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी रूपये
8) कर्करोग उपचारासाठी 8 कोटी रुपये
9) सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करून 2061 कोटी रुपयांची तरतूद करणार
10) शालेय शिक्षण विभागास 2 हजार 353 कोटी रुपये देण्यात येणार
11) क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पात 385 कोटी रुपयांची तरतूद
12) कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटी रुपयांची तरतूद
13) लता मंगेशकर यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद
14) शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी आणि मुंबई च्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपये खर्च करणार
15) राज्यातल्या सर्व तृतीयपंथीना ओळखपत्र देण्यात येणार
16) मुख्यमंंत्री ग्रामसडक योजना सात हजार पाचशे कोटी च्या 10 हजार किमीच्या ग्रामीण रस्त्यांना मंजुरी
17) सागरी महामार्गासाठी 500 कोटी
18) सार्वजनिक बांधकाम विभागासाठी रस्ते विकासासाठी 15 हजार कोटी इमारत बांधणीसाठी 1 हजार कोटी
19) जलसंपदा विभागासाठी 13 हजार 252 कोटींच्या निधीची तरतूद
20) उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1 हजार 160 कोटींच्या निधीची तरतूद
21) साईबाबा शिर्डी विमानतळासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद
22) रायगड किल्ला व परिसर विकासासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद
23) जलजीवन मिशन योजनेसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद
24) औरंगाबाद येथे वंदे मातरम सभागृह उभारणार येणार असून त्यासाठी 43 कोटी रुपयांची तरतूद