हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढलं असा आरोप त्यांनी केला . त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी सर्व- धर्म समभाव पाळला अन् हा पठ्ठ्या म्हणतो जातीपातीचं राजकारण केलं, काय बोलावं आता…..असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना फटकारले.
इंदापुरात आज अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडतो आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. पवारसाहेबांनी त्यांचं सगळं राजकारण करताना सर्व धर्म समभाव सांभाळला. सगळ्या जातीधर्मातील लोकांना नेतृत्व करण्याची संधी दिली आणि हा पठ्ठ्या म्हणतो, जातीपातीचं राजकारण केलं, काय बोलावं आता…..”, असं अजित पवार म्हणाले.
“कुणीही सांगावं साहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. साहेबांचे पहिल्यापासून ते आतापर्यंतचे निर्णय काढून बघा ना, त्यामध्ये कुणीही दाखवावं, त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं… प्रत्येकवेळी त्यांनी सर्व धर्म समभाव हीच भूमिका ठेऊन मार्गक्रमण केलं. शरद पवारांच्याभोवती राजकारण फिरतं, म्हणून ही टीका होते”, असंही अजित पवार म्हणाले.