कराडात काँग्रेससह सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यपाल विरोधात जोडेमारो आंदोलन

Karad Protest
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे नेते शुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहे. कराडातही काँग्रेससह सामाजिक सामाजिक संघटनेचे नेते व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडमारे आंदोलन केले.

कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर सर्व संघटनेचे पदाधिकारी आज एकत्र आले. यावेळी त्यांनी सुरुवातीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारले. त्यानंतर त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सर्वपक्षीय, संघटनेच्या नेत्यांकडून करण्यात आली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/428503272831211

कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील असं कोश्यारी म्हणाले.