हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2011 पासून सरकार औषधांवर क्यूआर कोड लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे, मात्र हे आतापर्यंत शक्य झालेले नाही. पण आता हे प्रत्यक्षात होणार असल्याचे दिसून येत आहे. आता आपल्याला लवकरच सर्व औषधांवर कोड (क्यूआर) पहायला मिळतील. हा क्यूआर कोड लागू करण्याचा फायदा असा आहे की हे औषध खरे आहे की बनावट आहे ते समजेल. तसेच, त्यांचे ट्रॅकिंग देखील केले जाऊ शकते.
TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, यासंदर्भात एक समिती स्थापन केली गेली आहे जी आता त्यासंदर्भातली रूपरेषा तयार करेल. क्यूआर कोडमुळे औषधांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग करायला मदत होते. तसेच बनावट आणि चुकीच्या घटकाची औषधे रुग्णांपर्यंत पोहोचण्याची शक्यता देखील कमी होते.
पंतप्रधान कार्यालय, नीति आयोग, कॉमर्स मिनिस्ट्री, डिपार्टमेंट ऑफ फार्मास्यूटिकल्स आणि आरोग्य मंत्रालयाच्या प्रतिनिधींची गेल्या आठवड्यातच यासंदर्भात एक बैठक झाली ज्यामध्ये या प्रकरणाला लवकरच मार्गी लावण्यासाठीची अधिसूचना जारी केली जाईल. TOI च्या म्हणण्यानुसार, आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली गेली आहे, जी 21 दिवसांत आपला अहवाल सादर करेल.
2011 पासूनच सरकार औषधांवर क्यूआर कोड लागू करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र औषधनिर्माण संस्था आणि लॉबी ग्रुप्सने ट्रेसिंग व ट्रॅकिंगसंदर्भात विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, यासाठी एकच क्यूआर कोड सिस्टम असावी. यावर एक स्त्रोत म्हणाला कि, याबाबत बरेच कनफ्यूजन होते. अखेरीस ही बाब आता निकाली निघेल. नुकत्याच झालेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, तेथे फक्त एकच क्यूआर कोड असावा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.