दाखवून देऊ! भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला राष्ट्रवादीचे ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत चॅलेंज

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. भाजप केवळ संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजपला जर फोडाफोडीचे राजकारण करायची इच्छा असेल, तर कशी फोडाफोडी होईल हे महाराष्ट्रात दाखवण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे. राष्ट्रवादी यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगेन अगेन’ सुरु करेल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपचे लोक सातत्याने संभ्रम निर्माण करत असल्याने लोकांना सत्य परिस्थिती कळाली पाहिजे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल. भाजपला जर फोडाफोडीचे राजकारण करायची इच्छा असेल, तर कशी फोडाफोडी होईल हे महाराष्ट्रात दाखवण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे. याशिवाय, काही काँग्रेसचे लोकही घरवापसीसाठी तयार आहेत. हे मिशन बिगेन अगेन महाराष्ट्रात सुरू करावे लागेल. भाजपमधून बाहेर पडू इच्छिणारे हे आमदार उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असे सर्व भागातील आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

सहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे कशाप्रकारे खच्चीकरण करण्यात आले हे लोकांना पाहिले आहे. अगदी वर्षभरापूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनाही हाच अनुभव आला. तिकडे सन्मान, स्वाभिमान नाही. त्यामुळे परत पक्षात आलं पाहिजे असं त्यांना वाटतंय. काही लोक सत्तेसाठी तर काही दबावाखाली गेले होते. काहींच्या इतर अडचणी होत्या. महाराष्ट्रात ५० ते साठ आमदारांनी राजीनामा दिल्याशिवाय सत्ता परिवर्तन होणार नाही. राजस्थान, मध्य प्रदेशसारखी परिस्थिती येथे नाही. अडचणीच्या काळात आमच्याबरोबर राहिलेले आमदार आता पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही यावेळी नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like