लाॅकडाउनमध्ये फ्री मध्ये मिळतंय Amazon Prime चे सबस्क्रिप्शन! अशी आहे प्रक्रीया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान, दूरसंचार कंपन्या आपल्या युझर्सना नवनवीन सेवा देण्यासाठी काहीनाकाही नवीन प्लॅन्स आणत आहेत.यासह काही जुने प्लॅन्सही बदलले जात आहेत. एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ मध्ये आपल्या युझर्सना बर्‍याच व्हिडिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जात आहे. त्याचबरोबर,बीएसएनएलने आपल्या पोस्टपेड प्लॅन युझर्ससाठी अ‍ॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्स​क्रिप्शन देण्याचे जाहीर केले आहे.जे कंपनीच्या काही प्लॅन बरोबर उपलब्ध असेल.चला तर मग जाणून घेऊयात बीएसएनएलच्या कोणत्या प्लॅनमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

BSNL gears up to take on rivals, offers free Amazon Prime ...

बीएसएनएलच्या या प्लॅन्समध्ये मिळेल अ‍ॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्स​क्रिप्शन
बीएसएनएल पोस्टपेड युझर्सना २९९ रुपयांपासून ९९९ रुपयांपर्यंतच्या प्लॅन्समध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्स​क्रिप्शन मिळू शकेल. यात ३९९ रुपये, ४०१रुपये, ४९९ रुपये, ५२५ रुपये,७२५ रुपये,७९८ रुपये,७९९ रुपये,१,१२५आणि १,५२५ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन्सचा समावेश आहे.या व्यतिरिक्त काही निवडक सर्कल्समध्ये उपलब्ध हा प्लॅन उपलब्ध आहेत ज्यात ४९९ रुपये आणि ७९८ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. या सर्कल्समध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा समावेश आहे.

लॉकडाउन में फ्री मिल रहा है Amazon Prime का सब्सक्रिप्शन

बीएसएनएलने ५ मे रोजी आपल्या युझर्सना ही सुविधा दिली आहे
बीएसएनएलने आपल्या सोयीसाठी लॉकडाऊन दरम्यान आपल्या प्लॅन्सची वैधता ५ मे पर्यंत वाढविली आहे.ज्यांचा प्लॅन्सची वैधता लॉकडाउनच्या मध्येच संपुष्टात येणार आहे अशा युझर्सना त्याचा लाभ दिला जाईल.याच वैधता संपल्यानंतरही असे युझर्स इनकमिंग कॉल घेण्यास सक्षम असतील. याव्यतिरिक्त,कंपनीने टोल-फ्री हेल्पलाइन नंबर देखील सुरु केला आहे.कंपन्यांनी सुरु केलेल्या टोल-फ्री हेल्पलाईन नंबरवर फोन करूनही युझर्स त्यांचा नंबर रिचार्ज करू शकतात.यासाठी आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही. आपला नंबर फक्त एका कॉलद्वारे रीचार्ज केला जाईल. मोबाईल शॉपवर जाऊन नंबर रिचार्ज करणार्‍या अशा युझर्ससाठी ही सेवा खूपच उपयुक्त ठरणार आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.