‘द कश्मीर फाइल्स’ जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती …”: अमित शाहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला असून याचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. तर या चित्रपटावरुन देशातल्या राजकारणही चांगलेच तापले आहे. या चित्रपटावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली होते हे त्यांना कळेल, असे शाहा यांनी म्हंटले आहे.

अहमदाबाद महानगर पालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमास मंत्री अमित शाहा यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, ज्यावेळी या देशात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. तेव्हा त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. नरेंद्र भाई (नरेंद्र मोदी) दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवले. ज्या क्षणी नरेंद्रभाईंनी कलम हटवण्याचा निर्णय घेतला, त्या क्षणी देशभरातील लोकांना हे समजले की नरेंद्रभाईंसारख्या प्रबळ इच्छाशक्तीच्या नेत्याने देशाचे नेतृत्व केले तर काहीही अशक्य नाही..

अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपताच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. यामध्ये 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी समुदायाला लक्ष्य केल्यानंतर काश्मिरी पंडितांना त्यांच्या मूळ राज्यातून जबरदस्तीने बाहेर काढण्याभोवती फिरते. या चित्रपटाला अनेक भाजपाशासित राज्यांनी करमुक्त केले आहे, अशीही माहिती यावेळी मंत्री शाहा यांनी दिली.

Leave a Comment