अमित शहांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गणेशोत्सवासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, विनोद तावडे आणि इतर नेते उपस्थित होते. लालबाग राजा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी पहायला मिळाला. केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली होती.

Lalbaughcha Raja Live : गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यापूर्वीच अमित शहांनी एक ट्विट केलं होत. त्यामध्ये त्यांनी म्हंटल, गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल अशी माहिती त्यांनी दिली.

 

अमित शाह यांच्या दौऱ्यात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरण्याची शक्यता आहे. अमित शाह भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भाजपचा महापौर बसवायचाच असा चंग भाजपने बांधला आहे. त्यातच शिंदे गटामुळे भाजपची ताकद वाढली असून उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भाजपशी जवळीक अलीकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळे भाजप , शिंदे गट आणि मनसे एकत्रितपणे लढून उद्धव ठाकरेंना धक्का देणार का ? यासंदर्भात राजकीय खलबते होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.