अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन, वाचा काय झाली बातचीत..

मुंबई प्रतिनिधी | युतीवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलेला असताना आता भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना काॅल केला असल्याचे बोलले जात आहे. ‘लवकरात लवकर युतीचा निर्णय घ्यावा, हिंदुत्वासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे’ असं सांगत शहा यांनी ठाकरेंना विनंती केल्याचं सुत्रांकडून कळत आहे.

अमित शहांच्या फोन नंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीच्या हालचालींना वेग आला असल्याची माहिती आहे. मात्र युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसून जागावाटपांवर सारा खेळ अवलंबून राहणार आहे.

दरम्यान काल जालना येथील भाजप कार्यकारणीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजप लाचार नाही, पण युतीला तयार आहे’ असे वक्तव्य केले होते. जे हिंदत्वाच्यासोबत असतील ते युतीत येतील असेही ते म्हणाले होते. तसेच शिवसेना नेते संजय राऊत हे सुद्धा ‘मोठा भाऊ किंवा वडील’ अशा बदलत्या भूमिके घेत युतीचे संकेत देताना दिसत आहेत.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…

शिवसेनेला निवडणुकांपेक्षा लोकांची कामे अधिक महत्वाची, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” म्हणणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

You might also like