कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत असतानाच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे याच्या बद्दल भाष्य केले आहे. शिवस्वराज्य यात्रेत उदयनराजे का सहभागी होत नाहीत असा प्रश्न विचारला असता अमोल कोल्हे यांनी उदयनराजे काही व्यक्तिगत कारणामुळे शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होत नाहीत असे म्हणले आहे.
तटकरे चुलत्या पुतण्याचा विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेना प्रवेश
अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा यात्रेने आज कराड शहतात प्रवेश केला. कराडमध्ये यात्रा दाखल होताच अमोल कोल्हे यांच्या समवेत जयंत पाटील, रुपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांना उदयनराजे यांच्या बद्दल विचारले असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादीच्या प्रेत यात्रेला जायला कोणीच तयार नाही ; दानवेंनी उडवली शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली
उदयनराजे पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे ते शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होत नाहीत असे अमोल कोल्हे यांना विचारले असता त्यांनी याचा इन्कार केला. उदयनराजे पक्षावर नाराज नाहीत. ते व्यक्तिगत कारणामुळे शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहू शकले नाहीत असे म्हणून अमोल कोल्हे यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
राणेंना भाजपमध्ये घेतल्यास आम्ही शिवसेनेत जाणार ; भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक
अजित पवारांना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; भाजपच्या या नेत्याने घेतली महत्वाची बैठक
कलम 370 प्रकरणी मोदी सरकारला झटका
बाळासाहेबांनी माकड म्हणून हिणवलेले दिलीप सोपल आमदारकी वाचवण्यासाठी शिवसेनेत
प्रकाश आंबेडकरांनी आघाडीसाठी कॉंग्रेस समोर ठेवला ‘हा’ फॉर्म्युला