Tuesday, October 4, 2022

Buy now

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आपल्याला कुठे कधी कसा मृत्यू येईल हे सांगता नाही येत. याचा प्रत्यय देणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. यामध्ये ‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमात एका माजी सैनिकाचा कार्यक्रम चालू असताना अचानक मृत्यू (ex serviceman died) झाला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रगीत म्हणत असताना अचानक माजी सैनिक खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू (ex serviceman died) झाला.

काय घडले नेमके ?
नाशिकमधील संदीपगर येथील शाळेत सोमवारी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आझादीका अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक चंद्रभान मालुंजकर यांना यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. चंद्रभान मालुंजकर 1962 च्या युद्धात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परिसरात सकाळी 9 वाजता प्रभातफेरी काढण्यात आली होती. यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना अचानक ते खाली कोसळले (ex serviceman died). यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू (ex serviceman died) झाला होता. मालुंजकर यांनी निवृत्तीनंतर सातपूर परिसरात माजी सैनिक संघटनांच्या माध्यमातून नव तरुणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या माघारी त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

हे पण वाचा :
पुलाअभावी अंत्यसंस्कारासाठी पूरातून नेला मृतदेह, मन हेलावून टाकणारा Video आला समोर

चालत्या बाईकवर विजेचा खांब पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

फलंदाजाला ‘स्लो मोशन’मध्ये आऊट देणारे अम्पायर Rudi Koertzen यांचे निधन

देवीच्या पाया पडला अन् मग दागिने चोरून पसार झाला, CCTV फुटेज आले समोर

नाराजी दूर नाही झाली तर अकेला काफी है; मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Related Articles

Latest Articles