हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीच्या पार्श्वभूमीर नागपुरात भाजपाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजपा नेते अनिल बोंडे देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादीचा सटच खराब आहे, आता त्यात शिवसेनेचा देखील समावेश होतो. राष्ट्रवादी पूर्णपणे भ्रष्टाचार मध्ये डुबली आहे. भ्रष्टाचाराशी माखलेले सर्वच नेते जेलमध्ये जाणार आहेत,” असे सूचक विधान बोंडे यांनी केले आहे.
भाजप नेते अनिल बोंडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विरोधी पक्ष नेता म्हणून माहिती गोळा करण्याचा देवेंद्र फडणवीस यांना अधिकार आहे. आम्ही फडणवीसांसोबत आहोत. फडणवीस यांच्यावर एकही आरोप सिद्ध होऊ शकत नाही. त्यांना लोकं माहिती आणून देतात कारण अनेक लोक त्रस्त आहेत. बदल्या संदर्भात सुद्धा फडणवीस यांना पहिली माहिती मिळाली. मनसुक हिरेन प्रकरणात जेव्हा माझ्याकडे पुरावे आहे असे फडणवीसांनी सांगितलयामुळे यांची फाटली आहे. ते घाबरले आहेत.
त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार आम्ही बदला घेऊ शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजप आक्रमकपणे या विरोधात आंदोलन करणार आहे. सरकारची दडपशाही चालणार नाही कार्यकर्ते चिडले आहे. लोकांमध्ये अराजक माजविण्याचा प्रयत्न हे तिन्ही पक्ष करत आहे. चंपा करेगा चॅम्पि, टरबूज करेंगा लाल , सारे साडेनगे जेल मे एसीपी वाले सालो साल, अशी टीका यावेळी बोंडे यांनी केली.