मुंबई | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी खुद्द गृहमंत्र्यांवर केले आहेत. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर आपले मत मांडले आहे. परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे असं मत देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. अशा आशयाचे ट्विट गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे.
"Sachin Waze's direct links in Antilia Case & Mansukh Hiren Case are coming forward. Param Bir Singh is afraid that its connections will reach up to him. He has made these false allegations to save & protect himself from legal action," tweets Maharashtra HM Anil Deshmukh pic.twitter.com/IU3tglb6cB
— ANI (@ANI) March 20, 2021
दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा