बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी? – अमृता फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावर परमबिर यांनी केल्याने राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवी यांनी बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी? असा सवाल करत आपलं मत व्यक्त केले आहे.

राज्याच्या राजकारणात प्रथमच एका पोलिस अधिकार्‍याने खुद्द गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत. आता ही गोष्ट खूप दूरपर्यंत जाईल असं मत अमृता फडणविस यांनी मांडले आहे. बादशाहला वाचवण्याकरता आता कितीजणांचा प्राण जाईल असा सवालही फडणवीस यांनी केलाय. बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ? अशा आशयाचे फडणवीस यांनी व्यक्त केलेय.

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment