शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याऱ्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत अनिल परबांचे मोठे विधान; म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी शुक्रवारी काही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत दगडफेक केली. या प्रकरणी काही एसटी कर्मचाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना भडकवल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. दरम्यान आता या आंदोलक कर्मचाऱ्यांबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाचे विधान केले आहे. “पवार यांच्या घरातील आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले त्यांना पुन्हा सेवेत घेता येणार नाही,”असे मोठे विधान परब यांनी केले आहे.

खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. तर या प्रकरणी गृह विभागानेहीआंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. 22 तारखे पर्यंत कामगार कामावर आले नाही तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचा विचार केला जाईल, असे परब यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही परिस्थतीत पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या संबंधित आंदोलक कर्मचाऱ्यांना आता पुन्हा सेवेत घेणे कठीण आहे. कारण त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे मोठे विधान परब यांनी केले आहे.

Leave a Comment