Wednesday, February 8, 2023

हि कोणती संस्कृती? भाजपच्या जनआक्रोश रॅलीतील महिलांचा डान्स; दमानियांचा चित्रा वाघ यांना सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि मॉ़डेल उर्फी जावेद यांच्यात खडाजंगी होत आहे. उर्फीच्या पेहरावाविरोधात तिच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चित्रा वाघ करत आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांच्यवर निशाणा साधला आहे. दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हिडीओ ट्विट केला असून “प्रिय चित्राताई वाघ, भाजपच्या श्री रमेश बिधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? याला आपण कुठली संस्कृती म्हणाल? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का?,” असा सवाल दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमध्ये भाजपची जन आक्रोश महासभेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत सभेत काही महिलांना नाचवण्यात आलेअसल्याचे दिसत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ रिट्विट करून अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना सवाल केला आहे.

- Advertisement -

व्हिडीओ ट्विट केल्यानंतर दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, “आज थोडा आदर आहे. राजकारणात कमबॅक करण्याचा किंवा स्व:तचं अस्तित्व निर्माण करण्याचा किंवा मंत्रीपद मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता.

ताई, तुम्हाला सांगावं वाटतं तुमचाच पक्ष आहे. तुमच्याच पक्षाने राठोडला मंत्रिपद दिलं असेल तर दुर्देव आहे. काल संध्याकाळी मी जन आक्रोश सभेचा व्हिडीओ पाहिला तेव्हा राहवलं नाही. राजस्थानमध्ये जनआक्रोश महासभा घेण्यात आली. त्यात तरुणी नाचत होत्या. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? असा सवालही स्मानिया यांनी केला आहे.