रशियामध्ये कोरोनाचा हाहाकार;गेल्या २४ तासांत १०,००० पेक्षा जास्त नवीन संसर्गाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रशियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची १०,००० पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली.यासह,या देशात प्रथमच कोविड -१९ रूग्णांच्या संख्येत एका दिवसात पाच अंकी वाढ झाली आहे.येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की १०,६३३ नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे हि मॉस्कोमधून समोर आलेली आहेत.यामुळे मॉस्कोची वैद्यकीय सुविधा बिघडण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे.उल्लेखनीय हे आहे की रशियामध्ये कोरोना विषाणूची लागण १,४४,००० लोकांना झाल्याची नोंद आहे तर १,४२० लोकांचा मृत्यू झाला आहे.

एका निवेदनात असे म्हटले आहे की,रविवारी या साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा हा ५८ वरून १,४२० वर आला आहे, तर १६,६३९ लोक यातून बरे झाले असून, गेल्या २४ तासांत बरे झालेल्या १,६२६ लोकांचा समावेश आहे.मॉस्को हे देशातील सर्वात अधिक संक्रमित शहर बनले आहे. गेल्या २४ तासांत येथे ५,४९८ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. त्याचवेळी, शहरात कोरोनाची लागण होण्याची संख्या ६८,६०६ वर पोहोचली आहे.

मॉस्कोचे महापौर सेजू सोब्यनिन यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की मॉस्कोमधील सुमारे २ टक्के लोकसंख्या म्हणजेच २३.५३ दशलक्ष लोकांना कोरोनाव्हायरसची लागण होऊ शकते. रशियामध्ये आतापर्यंत सुमारे ४० लाख लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. यापूर्वी रशियाने गेल्या २० दिवसात कोरोना रुग्णांसाठी १० हजार बेडचे एक रुग्णालय बांधून चीनचा विक्रम मोडला आहे.

रशियामध्ये तात्पुरती स्मशानभूमी देखील बांधली जात आहे. परिस्थिती बिघडणार आहे की नाही याबद्दल काहीशी भीती पसरली आहे. सध्या देशात अशाप्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही जिच्यामध्ये बरे झाल्यावर रुग्णाला पुन्हा संक्रमण झाले आहे.आता समोर असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकार मोठी तयारी करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment