नवी दिल्ली | भाजप पक्ष असा पक्ष आहे की त्या पक्षाकडे अर्थमंत्री पदावर भासवण्यासाठी हुशार चेहऱ्यांची नेहमी कमी असते. त्यामुळे अरुण जेटली यांची लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊन देखील अर्थमंत्री पदी वर्णी लागली होती. त्याचे झालेले असे की नरेंद्र मोदी यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला या पदावर बसवायचे होते. मात्र त्यांना अरुण जेटली यांना पर्याय दिसत नव्हता. म्हणून त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या नंतर देखील या पदावर बसवण्यात आले.
अरुज जेटली आपल्या हुशार बुद्धिमत्तेसाठी ओळखले जात होते. त्याच्याकडे देशातील चर्चित खटले वकिलीसाठी येत असत. अरुण जेटली आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच सर्वोच्च न्यायालयातील चर्चित वकिलांच्या यादीत समाविष्ट झाले होते. त्याच्या अर्थशास्त्राच्या ज्ञानात सुद्धा त्याचा कोणीही हात पकडू शकत नव्हते. विरोधकांना शांत बसवण्याची धमक त्यांच्या वाणीत ठासून भरलेली होती. ते विरोधकांना असेच शांत बसवत नव्हते. त्यांच्या तेजस्वी वक्तृत्वास बेजोड बुद्धिमत्तेची साथ होती. त्यामुळे विरोधक चारी मुंड्या चीत होते. त्यामुळेच जेटली मोदींना हावे हावेसे वाटत होते.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अरुण जेटली यांना अमृतसर मतदारसंघातून लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भाजपचा कट्टर मित्रपक्ष असणाऱ्या अकाली दलाने अरुण जेटली यांच्या उमेदवारीचे समर्थन केले होते. अरुण जेटली तुम्ही अमृतसरला या आणि फक्त उमेदवारी अर्ज भरा तुम्हाला मी निवडून आणतो असे अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांनी म्हणले होते. मात्र निकाल काही वेगळाच लागणार होता. सोनिया गांधींनी स्वतः कॅप्टन अमरेंद्र सिंग यांना फोन करून तुम्ही अमृतसर मधून लोकसभा लढावी अशी माझी इच्छा आहे असे म्हणले. तेव्हा अमरेंद्र सिंग सोनिया गांधींना नाही म्हणू शकले नाहीत. त्यांनी येथून निवडणूक लढली आणि ते जिंकले देखील. अरुण जेटली यांचा अनपेक्षित पराभव झाला. तरी देखील ते देशाचे अर्थमंत्री झाले.