हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांसह इतर पक्षातील नेत्यांकडूनही टीका केली जात आहे. दरम्यान, ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे गुजरातमध्ये दीर्घकाळ भाजपची सत्ता आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.
असदुद्दिन ओवेसी यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समान नागरी संहिता, मेहरुली हत्या असे मुद्दे उपस्थित करीत भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजप गुजरातमध्ये सध्या प्रचार करत आहे. त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या प्रचारात मुस्लिमविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष काँग्रेसच मते फोडणार आहे, असा आरोप केला जात आहे. मात्र, ते खोटे असल्याचे ओवेसी यांनी म्हंटले. एकंदरीत गुजरातच्या निवडणुकीत आता ‘एमआयएम’नेही उडी घेतल्यामुळे आता या ठिकाणी सत्तास्थापनेचा त्याच्याकडूनही दावा केला जाऊ लागला आहे.