हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनासोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसच्या मंत्र्याने आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका विभाजनाची मागणी केली आहे. मुंबईला विभाजीत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती आहे”, असा दावा शेलार यांनी केला.
शिवसेनेची भूमिका ताठर असेल संयुक्त मुंबई, एकसंघ मुंबई अशी असेल तर त्यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले पाहीजे, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे. मात्र या दोन्ही गोष्टी न करता केवळ धुळफेक करण्याचं काम शिवसेना करतेय. भाजपला मुंबईचं विभाजन, त्रिभाजन या कुठल्याही गोष्टी मान्य नाहीत. अशा पद्धतीने मुंबईचं विभाजन काँग्रेस आणि त्याला मुक संमती दिलेल्या शिवसेनेचा मुंबई तोडण्याचा प्रयत्न असेल तर जनता त्यांना स्वीकारणार नाही. भाजप या दोघांच्या विरोधात आंदोलन करेल”, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे
ठाकरे सरकारने भाजपच्या बड्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून देखील शेलार यांनी टीका केली आहे. ज्या पद्धतीने त्या यादीमधे भाजपच्या आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याचं वर्णन करायचं तर असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. या सरकारची मनोवृत्तीच असुरक्षित आहे”, असा टोला त्यांनी लगावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’