हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमधील कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराबाबत होणाऱ्या दुर्लक्षाची दखल घेत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली आणि यावेळी इम्रान खान यांच्या नेतृत्वातील फेडरल सरकार आणि प्रांतीय सरकारांवर जोरदार हल्ला केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.
‘जिओ उर्दू’ च्या अहवालानुसार, खंडपीठाने न्यायालयात सरकारची बाजू घेत असलेल्या अॅटर्नी जनरलला सांगितले की, “कोरोनाशी सामना करण्यासाठी सरकारने काहीही केलेले नाही.मंत्री आणि सल्लागारांची नुसतीच फौज आहे पण उपाय काहीही नाही. सल्लागारांना केंद्रीय मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे तर भ्रष्टाचारी लोकांना सल्लागार बनविण्यात आले आहे. “
अॅटर्नी जनरल खंडपीठाला म्हणाले, “सर, तुम्ही असे म्हणू नका.” त्यास उत्तर देताना सरन्यायाधीश म्हणाले, “मी कथितपणे भ्रष्टाचारी म्हटले आहे.” सरन्यायाधीश गुलजार अहमद म्हणाले, “मंत्रिमंडळाचा विशाल आकार पहा.४९ लोकांची काय गरज आहे. सल्लागारांनी संपूर्ण मंत्रिमंडळ काबीज केले आहे. इतक्या मोठ्या मंत्रिमंडळाचा अर्थ असा आहे की पंतप्रधानांना काहीच माहित नाही.”
कोर्टाने हे प्रकरण २० एप्रिलपर्यंत तहकूब केलेले आहे आणि फेडरल आणि प्रांतीय सरकारांना कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी घेतलेल्या ठोस पाऊलांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.