हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०४ देश आणि प्रदेशांना व्यापलेल्या कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा सोमवारी सकाळी ६९ हजार ४२४ वर पोहोचला आहे तर १२ लाख ७२ हजार ८६० लोक संसर्गित आहेत. उपचारानंतर दोन लाख ६२ हजार लोक बरेही झाले आहेत. दरम्यान, इजिप्शियन राजधानी कैरो येथे लिबियाचे माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. एका सूत्राने त्यांना कोविड -१९चा संसर्ग झाल्याचे सांगितले.
सिन्हुआ या वृत्तपत्राने रविवारी दिलेल्या वृत्तानुसार, “काही दिवसांपूर्वीच जिब्रिलला कोविड -१९ चा संसर्ग झाला होता आणि शनिवारी रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला होता.
“तथापि,त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा रविवारी झाली. त्याआधी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर कैरो च्या रुग्णालयात १० दिवस आयसोलेट ठेवण्यात आले होते,” अशी माहिती सूत्रांनी दिली.
जिब्रील हे नॅशनल फोर्सेस अलायन्सचे प्रमुख होते, लिबियाचे माजी नेते मुअम्मर अल-गद्दाफी यांना काढून टाकल्यानंतर आणि ठार केल्याच्या एका वर्षानंतर २०१२ मध्ये स्थापन झालेल्या नेशनल फोर्सेस एलायंस’चे ते प्रमुख होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग
कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क
शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार