भारताचे पाकिस्तानला दिले चोख प्रत्युत्तर,मुस्लिमांवरील भेदभावाचा आरोप लावला फेटाळून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या आश्रयाने देशात मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप भारताने फेटाळला.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, पाकिस्तानी नेतृत्त्वाची हा विचित्र आरोप पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दुर्बल प्रयत्नांपासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी चाललेला प्रयत्न आहे.

खरं तर, कोरोना विषाणूच्या संकटाच्याखाली भारत सरकारने मुद्दाम मुस्लिम समुदायाला लक्ष्य केले असल्याचा आरोप खान यांनी रविवारी केला. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की कोविद -१९च्या उपाय योजनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पाकिस्तानी नेतृत्व आपल्या शेजार्‍यांवर निराधार आरोप करीत आहे.खान यांनी केलेल्या टीकेसंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. श्रीवास्तव असेही म्हणाले की अल्पसंख्यांकांच्या बाबतीत त्यांना हाच सल्ला आहे की तुमच्या इथल्या अल्पसंख्याक समाजाची काळजी घ्या कारण सगळ्यात जास्त अल्पसंख्यांकांवर भेदभाव तुमच्याच इथे होतोय.

रविवारी पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या ८६९ नवीन घटना घडल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या ८३४८ वर पोहोचली आहे.सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, सर्वाधिक प्रभावित पंजाब प्रांतात आतापर्यंत ३८२२, सिंधमधील २५३७,खैबर-पख्तूनख्वा मधील १,१३७, बलुचिस्तानमध्ये ३७६, गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये २५७, इस्लामाबादमध्ये १७१ आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके)४८ संसर्गाच्या घटना घडल्या आहेत.

तिथे रविवारी मृत झालेल्या नऊ रुग्णांसह एकूण मृतांची संख्या १६८ वर पोहोचली आहे . राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने म्हटले आहे की सिंध प्रांतात एकाच दिवसात जास्तीत जास्त आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये गेल्या २४ तासांत ७८४७ जणांची तपासणी करण्यात आलेली आहे जे कि आतापर्यंत ९८,५२२ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच,१८६८ लोक बरे झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान काही परदेशी हवी सेवा परदेशात अडकलेल्या ४०,००० पाकिस्तानी नागरिकांना परत आणण्याची परवानगी देईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.