“देवेंद्र आहेत ते, लवकरच तुमचा बाजार उठवणार”; भातखळकरांचा ट्विटद्वारे आघाडी सरकारवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्याचे राजकारण तापले असून विरोधकांकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकावर आरोप केले जात आहेत. दरम्यान काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी खासदार शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष नाव घेत आरोप केला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “देवेंद्र आहेत ते तळपती तलवार आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच बाजार उठवणार आहेत,” असे ट्विट करीत भातखळकर यांनी इशारा दिला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करीत महाविकास आघाडी सरकारवर आज हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, काल देवेंद्र फडणवीस यांनी जे काही पुरावे अधुवेशनात सभागृहात सादर केले. देवेंद्र आहेत ते, तळपती तलवार आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच
बाजार उठवणार आहेत,” असे भातखळकर याणी म्हंटले आहे.

दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांच्यात व शरद पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी तगू लागल्या आहरेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांना पवारांनीही उत्तर दिले. त्यानंतर फडणवीसांनीही पवार यांना ऑडिओ क्लिप प्रकरणी खोलात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.