हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी संसदेतील भाषणावेळी कोरोना हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे वाढला, अशी टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका करीत देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला. दरम्यान भाजप नेत्यांनी संसदेत महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरु असताना बाक वाजवले. यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजपवर टीका केली. राज्यातल्या भाजप नेत्यांना महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे वाटतात, असे विधान त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत टीका केल्यानंतर त्याच्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदींना काही तिखट प्रश्न विचारत जहरी टीका केली होती. भाजपकडूनही सुप्रिया सुळेंना उत्तर देण्यात आले होते. मोदींनी संसदेत बोलताना फक्त कोरोना आणि महाराष्ट्रच नव्हे अन्य काही मुद्द्यावरूनही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता, असे म्हणण्यात आले होते. दरम्यान काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व काँग्रेसवर टीका केल्यानांतर त्याच्या या वक्तव्याचा निषेध काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्यावतीने नोंदवला जात आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच्यानंतर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनीही भाजप नेत्यांवर टीका केली आहे.