औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शहराच्या नामांतर बाबत कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झालेच तर चांगलेच आहे. आता राजकारण करणारे खासदार खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना मत विभाजन साठी उभे केले होते जलील हे खैरेचे चेले असल्याचा आरोप या वेळी जाधव यांनी केला.

कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती काही महिन्यातच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या होत्या त्या संदर्भात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महानगरपालिका या निवडणुका आम्ही लढणार असल्याचे जाहीर केले असून शहरांमधील कचरा पाणी हे महत्त्वाचे विषय असून नागरिकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात तसेच जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे दोन महिने जेलमध्ये असताना तिथले अनुभव त्यांनी सांगितले. जशी भट्टीमध्ये वीट भाजली जाते त्याच प्रमाणे माणूस कारागृहातुन आल्यानंतर मजबूत होत असल्याचे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

तसेच गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहराच्या नामांतर बाबत आणि त्यांनी आपली मते मांडली परंतु यावेळी कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हताच त्यामुळे सहाजिकच औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे परंतु त्यासोबत विकास देखील झाला पाहिजे असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच खासदार इम्तियाज जलील हे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे चेले असल्याचा आरोप या वेळी त्यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like