हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील Axis Bank कडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या ठराविक फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 75 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात आली आली आहे. 14 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. या आधीही बँकेने 1 ऑक्टोबर 2022 रोजी एफडी वरील व्याज दर वाढवले होते.
आता Axis Bank च्या 7 दिवस ते 29 दिवस आणि 30 दिवस ते 60 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर अनुक्रमे 2.75 टक्क्यांवरून वाढवून 3.50 टक्के आणि 3.25 टक्क्यांवरून वाढवून 3.50 टक्के करण्यात आले आहेत. तसेच 61 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 3.25 टक्क्यांवरून 4 टक्के झाला आहे.
या कालावधीचे व्याजदर पहा
आता 3 ते 6 महिन्यांच्या FD वरील व्याजदर 3.75 टक्क्यांवरून 4.25 टक्के करण्यात आला आहे. यानंतर आता Axis Bank 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5 टक्के, 1 वर्ष ते 15 महिने कालावधीच्या FD वर 6.10 टक्के तसेच 15 महिन्यांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.15 टक्के देत राहील.
या दर वाढीनंतर, आता Axis Bank कडून 2 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या FD वर 6.20 टक्के आणि 3 वर्ष 25 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.10 टक्के व्याजदर दिला जाईल. अॅक्सिस बँकेतील NRE आणि FCNR डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याजदर तपासा
आता Axis Bank कडून विशिष्ट कालावधीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या एफडीवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. आता बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी ज्येष्ठ नागरिकांना 3.5 टक्के ते 6.90 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त