बंडातात्या कराडकरांवर करणार बदनामीचा खटला दाखल ; बाळासाहेब पाटील यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह साताऱ्याचे पालकमंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी आता बंडातात्या कराडकर यांच्या वरती गुन्हा दाखल करून बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुणे येथे दिला आहे.

व्यसनमुक्त युवक संघानच्या वतीने काल वाईन विक्री विरोधात सातारा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. त्याच्या वक्तव्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला पदाधिकार्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काल रात्री राज्य महिला आयोगाकडून आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका मांडली. तसेच सातारा पोलिसांकडूनही आंदोलनाला परवानगी नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कायदेशीर रित्या बंडातात्या कराडकर यांच्या वरची गुन्हा दाखल करणार अशे. तसेच बदनामीचाही खटला दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे आता बंडातात्या कराडकर यांच्यापुढील अडचणीत वाढ होणार आहे.

बंडातात्या कराडकर यांच्याकडून माफी

कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मुलाबद्दल काल केलेले वादग्रस्त वक्तव्य आज कराडकर यांनी मागे घेतले आहे. तसेच हे वक्तव्य चुकून झाले असून मी माफी मागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव निर्व्यसनी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment