बाळासाहेब ठाकरे युतीतून बाहेर पडून राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार होते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असतानाच शिवसेना युतीतून बाहेर पडण्याचा मानसिकतेत होती. त्यानुसार शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव देखील आला होता. मात्र, काही कारणामुळे ते जमले नाही. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांनीच युतीतून बाहेर पडण्याचा विचार केला होता. आम्ही काँग्रेस सोबत आघाडीत असतानाच शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव आला होता. मात्र तेव्हा ते शक्य झाले नाही. मात्र 2019 ला महाविकास आघाडी जमली असे नवाब मलिक यांनी म्हंटल.

भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते. त्यामुळे सेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले असेही नवाब मलिक म्हणाले. सेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे परंतु आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला