हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Alert : देशातील बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा प्रकारची फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गानी लोकांची फसवणुक करत आहेत. अनेक बँकांकडून लोकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी सतत चेतावणी जरी केल्या जातात. नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाने देखील आपल्या ग्राहकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
तर SBI आणि बँक ऑफ बडोदाने आपल्या खातेदारांना सावध करण्यासाठी सुरक्षित बँकिंगच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत. SBI एक ट्विट करत म्हंटले कि, “वापरात नसलेली फीचर्स डिसेबल करून आमच्यासोबत सुरक्षित आणि सुलभ ऑनलाइन बँकिंग अनुभवासाठी तुमच्या इंटरनेट बँकिंगवर उपलब्ध असलेल्या प्रत्येक सिक्योरिटी फीचर्स जाणून घ्या !” Bank Alert
Protect yourself by disabling features that aren't in use & find every security feature available on your Internet Banking for a safe and easy online banking experience with us!
Stay Alert & #SafeWithSBI. #CyberSafety #AmritMahotsav #AzadiKaAmritMahotsavWithSBI pic.twitter.com/Zr3qfw8vqa— State Bank of India (@TheOfficialSBI) July 6, 2022
बँक ऑफ बडोदाने अकाउंट सेफ्टी टिप्स संदर्भात ट्विटरवर एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी बँकेने एका पोस्टद्वारे म्हटले की, “जशी तुम्ही पावसात तुमची सुरक्षितता सुनिश्चित करता, त्याचप्रमाणे तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स फॉलो करून तुमच्या बँक खात्याची सुरक्षितता देखील सुनिश्चित करू शकता.” Bank Alert
BoB द्वारे जारी केल्या गेलेल्या टिप्स
1. कोणत्याही अनव्हेरीफाइड UPI लिंकवर क्लिक करू नका.
2. आपला OTP, ATM पिन किंवा UPI पिन कोणासोबतही शेअर करू नका.
3. सोशल मीडियावरील मोहक ऑफर्सला बळी पडू नका.
4. सुरक्षित वेबसाइटवर संवेदनशील डेटा एंटर करा म्हणजेच वेबसाइट लॉक केलेल्या लॉकच्या आयकॉनसह ‘http://’ ने सुरू झाली पाहिजे. Bank Alert
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://m.rbi.org.in/scripts/
हे पण वाचा :
SBI कडून दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची संधी, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचे नवीन दर पहा
Multibagger Stock : गेल्या पाच वर्षांत ‘या’ शेअर्सने दिला 450% रिटर्न, गुंतवणूकदार झाले मालामाल